Posts

Showing posts from December, 2023

छोटीशी सफर साऊथ ईस्ट आशियाची

Image
छोटीशी सफर साऊथ ईस्ट आशियाची अमक्या तमक्याच्या कुंडलीत परदेशगमन योग आहे हे वाक्य ऐकून किंवा रोजचे राशीभविष्य या सदरात परदेशगमन योग आहे हे वाचून मला गेली कितीतरी वर्षं एक वेगळंच काहीतरी वाटायचं. हा योग माझ्या कुंडलीत कसा आणता येईल हा विचार शेकडो वेळा केला मी ... त्यापूर्वी अनेकदा माझ्या राशिभविष्यात हे भाकीत मी वाचले होते बरं का !! पण मार्च २०१९ मध्ये ग्रहताऱ्यांनी बरेच काही खेळ केले असावेत कारण हा योग आता माझ्या केवळ कुंडलीतच नव्हे तर आयुष्यात आला होता. २०१८ नोव्हेंबरमध्ये मी आदिनाथ टूर्स, रावेतमध्ये वीणा वर्ल्ड कडून सिंगापूर, मलेशिया, थायलंड ही दहा दिवसीय टूर बुक केली आणि ठरवलं गणपती बाप्पा कसा आपल्याकडे दहा दिवस पाहुणा म्हणून मुक्कामी येतो आणि आपले सगळे लाड पुरवून घेतो तसे मी आता माझे स्वतःचे लाड करून घेणार होते. यथोचित शॉपिंग, ट्रीपची मित्रमंडळी- नातेवाईक यांच्यात भरपूर प्रसिद्धी (फक्त बॅनर लावणे बाकी होते) ... रजा मंजूर करून घेणे वगैरे सोपस्कार झाल्यावर अस्मादिकांचे कुटुंब मुंबई इंटरनॅशनल विमानतळावर दाखल झाले, तत्पूर्वी व्हिसा, करन्सी बदलणे कार्यक्रम वीणा वर्ल्डच्या...

लंडनवारी - भाग ६ (अंतिम भाग)

Image
लंडनवारी - भाग ६ (अंतिम भाग) कला क्रीडा संस्कृती हल्ली आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्याला बांधलंय असं म्हणतात ते काही खोटं नाही. लंडनमध्ये जागोजागी मोठ-मोठी आणि विविध प्रकारची घड्याळं बघायला मिळतात. ही घड्याळे शहराच्या सौंदर्यात भर तर घालतातच, पण यातून दिसून येतो तो ब्रिटिशांचा वक्तशीरपणा . म्हणजे घरातून माणूस वेळेत निघाला तरी रस्त्यात त्याला उशीर होऊच नये म्हणून कुठेही बघितलं तरी घड्याळ दिसावे अशी सोय करून ठेवली असावी असा समज मी करून घेतलाय. Big Ben ला फोटोस्पॉट जरी मानला तरी इतरत्र, अवतीभवती खूप छान छान घड्याळांचं दर्शन होतं जे खरोखर मनाला भुरळ घालतं.  ब्रिटिश माणूस सकाळी लवकर उठतो, त्याच्या त्याच्या मार्गाने कामाला जातो, संध्याकाळी वेळेत घरी येतो आणि सगळं काही आवरून लवकरच झोपी जातो. इथली बहुतांश सगळीच दुकानं, मॉल्स साधारणपणे आठच्या दरम्यान बंद होतात. याला अपवाद मात्र शुक्रवार आणि शनिवारची संध्याकाळ... हे लोक शुक्रवारी संध्याकाळीच ऐश करायला सुरुवात करतात, मग त्यांना त्यात कसलंही वावडं नाही. सगळेच बार, पब्ज या ठिकाणी रंगतदार पार्ट्या सुरू असतात. त्या अगदी उशिरापर्यंत च...

लंडनवारी - भाग ५

Image
लंडनवारी - भाग ५ लंडन देखा ये नही देखा तो लंडन मे क्या देखा ? यही तो है असली लंडन ... असं जर कुणी तुम्हाला म्हणत असेल तर नक्की समजायचं की ती व्यक्ती सेंट्रल लंडन बाबत बोलत आहे. मुळातच लंडन हे शहर तसं महागेस्ट शहर (अर्थात त्याच्याही वर पॅरिस आहे म्हणा)  .. तरीही तिथे जायचा मोह आवरता येत नाहीच.  Trafalgar Square ... Westminster city मधला एक सार्वजनिक चौक ... चौकासारखा चौक त्यात काय एवढं ? असा प्रश्न मनात येतो न येतो तोच त्याचं उत्तर मिळालं ... पूर्वी ह्या चौकाचं नाव charing cross असं होतं. फ्रान्स आणि स्पेन यांच्या विरुद्ध खूप मोठी लढाई इंग्लंड देशाने लढली (जवळपास ३०० वर्ष म्हणे) आणि अर्थातच त्यात इंग्लंडचा विजय झाला त्या विजयाप्रीत्यर्थ या चौकाच नाव Trafalgar Square ठेवण्यात आलं अशी आख्यायिका आहे. गेल्या सहस्रकाहून काही काळ इंग्लंड देश अपराजित राहिला आहे. दुसरं कुणी आपल्यावर राज्य करेल आणि मग आपण त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवू यापेक्षा आपणच इतरांवर राज्य करत राहू म्हणजे आपण कधी पारतंत्र्यात जाणारच नाही अशी त्यांची राजनीती आहे असंही कळलं. त्यांच्या या राजनीतीचं कौतुक करावं...