Posts

Showing posts from December, 2025

SLO की कमाल

Image
SLO की कमाल  काय आहे हा प्रकार ? सांगते, सांगते ... संपूर्ण ब्लॉग वाचल्यावर तुम्हाला लगेचच कळेल. त्याचं झालं असं ... बस चुकली ... आता काय करायचं ? थोडं लवकर निघायला हवं होतं मी ... का ऐकते मी कोणाचं ? स्वतःचं एकदा ठरल्यावर तसं करायचं होतं ना मी ... विचारचक्र अगदी जोरजोरात फिरत होतं. काही प्रश्न आणि काही विधानं मी स्वतःच्या मनाशीच करत होते. Finchley Road वरचा तो बस स्टॉप माझ्याकडे तोंड वेंगाडत बघतोय असं वाटलं मला. आता सगळं हे लेकीला सांगणं भाग आहे असं डोक्यात असतानाच फोन वाजला. अपेक्षाप्रमाणे आमच्या बयेचाच होता. तुझी बस चुकली आहे, मी ट्रॅक करत होते. असा राग आला ना या इंटरनेटचा ... काही म्हणता काही गुप्त ठेवता येत नाही ... हम्मम ... एवढंच उच्चारून मी म्हणाले की मी काढते दुसरं तिकीट, तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. जवळच्या O2 शॉपिंग सेंटर मध्ये शिरले आणि आता इथे बसून तिकिटाचं बघूया असा विचार केला ... खरं म्हणजे last minute. com हा माझा पिंड नाहीये, पण आता काय आलिया भोगासी ... आज सकाळीच (माझ्या स्वप्नात बरं का ...) भविष्य वाचलं होतं की दैव १००% तुमच्या बाजूने असेल. ...