Posts

सेवा परमो धर्म: ।

Image
सेवा परमो धर्म: । गोविंदा ... गोssssविंदा अत्यंत जादुई असा हा जयघोष. तब्बल सात दिवस या जयघोषाच्या अनुभूतीने कान आणि मन अगदी तृप्त झालंय. त्या तृप्तीतच परतीचा प्रवास सुरू आहे. डोळ्यासमोरून व्यंकटेशाचे रूप हटतच नाहीये आणि ते सर्व क्षण नजरेसमोर सतत तरळत आहेत. ये हृदयीचे ते हृदयी पोहोचावं म्हणून माझं हे मनोगत ... हा लेखप्रपंच ❤️ ... त्याचं झालं असं .... मागच्या वर्षीपासून सतत माझ्या मनात येत होतं की आपण तिरुपती बालाजीच्या सेवाकार्यासाठी जाऊया. माझी जाऊ नऊ/दहा वर्षांपूर्वीच या सेवेसाठी जाऊन आली होती. पण मी कधी तो विचारही मनात केला नाही. पण गेल्या दोन-चार वर्षात परमेश्वराने माझ्यावर/माझ्या कुटुंबावर जो काही सुखाचा, आनंदाचा, यशाचा वर्षाव केला तेव्हा मात्र त्या परमेश्वराचे आभार आपण मानलेच पाहिजेत ही भावना दृढ झाली आणि सेवेला जाऊयाच या विचाराने जोर धरला. पण जाणं इतकं सहज/सोपं नाहीये हे लक्षात आलं. दोन-चार वेळा संधी येऊनही कुठल्या ना कुठल्या कारणाने हुकली (इथे ती कारणे लिहीत नाहीये) पण यावेळी मात्र योग आला आणि तो देखील अधिक महिन्यात... या वेळेची अडचण तसं बघायला गेलं तर जास्त मोठी ...

आजि सोनियाचा दिनु

Image
यश हे अमृत झाले !!! वंदे मातरम् आजि सोनियाचा दिनु सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!! आजपासून बरोब्बर वर्षांपूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे पाच वाजायच्या सुमारास गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् मधून औपचारिक रित्या कळविण्यात आले की सिद्धी कापशीकर हिने जवळपास साडेदहा तास सलग संवादिनी वाजविण्याचा जो प्रयत्न केला त्याला यश आले आहे.  तिच्या या प्रयत्नाची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स ने तिची नोंद घेतली आणि तिला मान्यतेचे प्रमाणपत्र दिले.  मग काय विचारता ... आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ... भराभर तिच्या या कामगिरीचा मेसेज टायपून सर्वत्र धाडून दिला आणि अक्षरशः शून्य मिनिटात सुरू झाला अभिनंदनचा, कौतुकाचा वर्षाव !! आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु । आजि सोनियाचा दिनु । माझी ही लंडनवारी अगदी सार्थकी लागली हा विचार मनात चालू होता. आलेल्या प्रत्येक मेसेजला प्रतिसाद देईपर्यंत फोनची रीघ लागली. प्रत्येकाशी अगदी थोडंच बोलणं शक्य होतं, कारण त्याचवेळी बरेचसे कॉल्स वेटिंगवर होते. अर्थातच सगळ्यांनी ते समजून घेतलंही. खूप जणांनी हात आखडता न घेता अ...

Walkathon : एक आनंदानुभूती

Image
Walkathon : एक आनंदानुभूती I am a Finisher ... अगदी स्टाईलमध्ये मी फोटो काढला आणि आता बाकी कुठे, काय चाललंय ते बघायला गेले. खरं म्हणजे मी सहा किलोमीटर चालून आले होते, पण बिलकुल दमले नव्हते. उत्साह, आनंद अगदी ओसंडून वाहत होता. त्याचं कारण पण तसंच आहे ... मी हा चालायचा उपक्रम खूप जणांबरोबर एकत्रित केला होता. त्यामुळे अनेकांची सकारात्मक ऊर्जा माझ्यात आली होती. निमित्त होते ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र पालक महासंघ आयोजित Walkathon चं !!! आजचा दिवसच माझ्यासाठी अगदी स्पेशल ठरला होता, तो देखील अगदी सकाळच्या तीन चार तासात. झालं असं की... पहाटे पाच वाजता गजर वाजला आणि मी उठले ... खरंतर अडथळा आणणारं घरात कोणीही नव्हतं, पण माझीच खूप लगबग चालली होती... का तर Walkathon ला जायचंय म्हणून ... यापूर्वी मी चार-पाच  सायक्लोथॉनला गेले आहे, पण Walkathon ला जायचा हा माझा पहिलाच अनुभव. आणि पहिला अनुभव नेहमीच स्पेशल असतो. तसं बघायला गेलं तर चालायची सवय असल्याने तो भरपूर अनुभव माझ्या गाठीशी आहे, पण Walkathon काहीतरी वेगळं असेल असं माझं मन मला सांगत होतं आणि खरोखर त्याची प्रचिती आलीच...

लंडनचा नाताळ

Image
झिलमिल सितारों का आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा या वाक्यांची प्रचिती मी संपूर्ण डिसेंबर महिन्यात अनुभवली. नाताळनिमित्त संपूर्ण महिनाभर लखलखणारे लंडन शहर, वेळी अवेळी कधीही येणार पाऊस आणि हा संपूर्ण महिना इथेच तळ ठोकून असणारी मी ... पण खरंच लंडनचा नाताळ एक अनुभूतीच आहे. अगदी लहानपणीच पुलंनी आमच्या डोक्यात लंडनचा नाताळ हे दोन शब्द अक्षरशः कोरले आणि ते कधी बकेट लिस्ट मध्ये गेले ते कळलंच नाही. लंडनचा नाताळ अनुभवायचं हे स्वप्न २०२५ मध्ये पूर्ण झालं. डिसेंबर महिना उजाडताच लंडन शहर जणू एखाद्या परीकथेतून बाहेर आल्यासारखं दिसू लागतं. थंडीची झुळूक, रस्त्यांवर पसरलेले सोनेरी दिवे, दुकानांच्या  सजवलेल्या काचा, ख्रिसमस थीममध्ये आणि सर्वत्र ऐकू येणारी Christmas carols ... यामुळे लंडनचा नाताळ एक वेगळाच अनुभव देतो. डिसेंबरची थंडी अंगावर शहारा आणते आणि त्याचवेळी लंडन शहर अगदी अलगद हसते. संध्याकाळी आकाशात लवकर पसरलेला अंधार रस्त्यांवरच्या झगमगत्या दिव्यांनी पराभूत होतो. जणू काही लंडन स्वतःला आणि आपल्याला सांगत असते ... थंडी असो वा अंधार, आनंद थांबत नाही. लंडनमध्ये ना...

SLO की कमाल

Image
SLO की कमाल  काय आहे हा प्रकार ? सांगते, सांगते ... संपूर्ण ब्लॉग वाचल्यावर तुम्हाला लगेचच कळेल. त्याचं झालं असं ... बस चुकली ... आता काय करायचं ? थोडं लवकर निघायला हवं होतं मी ... का ऐकते मी कोणाचं ? स्वतःचं एकदा ठरल्यावर तसं करायचं होतं ना मी ... विचारचक्र अगदी जोरजोरात फिरत होतं. काही प्रश्न आणि काही विधानं मी स्वतःच्या मनाशीच करत होते. Finchley Road वरचा तो बस स्टॉप माझ्याकडे तोंड वेंगाडत बघतोय असं वाटलं मला. आता सगळं हे लेकीला सांगणं भाग आहे असं डोक्यात असतानाच फोन वाजला. अपेक्षाप्रमाणे आमच्या बयेचाच होता. तुझी बस चुकली आहे, मी ट्रॅक करत होते. असा राग आला ना या इंटरनेटचा ... काही म्हणता काही गुप्त ठेवता येत नाही ... हम्मम ... एवढंच उच्चारून मी म्हणाले की मी काढते दुसरं तिकीट, तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. जवळच्या O2 शॉपिंग सेंटर मध्ये शिरले आणि आता इथे बसून तिकिटाचं बघूया असा विचार केला ... खरं म्हणजे last minute. com हा माझा पिंड नाहीये, पण आता काय आलिया भोगासी ... आज सकाळीच (माझ्या स्वप्नात बरं का ...) भविष्य वाचलं होतं की दैव १००% तुमच्या बाजूने असेल. ...

वंदे मातरम्

Image
Sirtth Musicals प्रस्तुत वंदे मातरम् ७ नोव्हेंबर २०२५ ... High Commission Of India, London यांची post जानेवारी २०१८ .. फोटो वंदे मातरम् - जानेवारी २०१८ वंदे मातरम् ... वंदे मातरम् संपूर्ण सभागृह भरून आणि भारून टाकणारे सिद्धीचे स्वर प्रत्येकाच्या कानात घुमत होते, मनात आपल्या देशाप्रति अभिमान जागत होता, मिटल्या नयनांनी सर्वजण ते दृश्य पहात होते.  मी मनोमन सुखावत असतानाच माझे मन मला जानेवारी २०१८ मध्ये घेऊन गेले. काय गंमत आहे ना आपल्या मनाची.... कुठलंही तिकीट काढावं लागत नाही, कुठला visa लागत नाही, कुठली बॅग भरावी लागत नाही, कुणाची परवानगी लागत नाही (अगदी स्वतःचीसुद्धा) ... आवडेल तिथे या मनाचा प्रवास अगदी स्वच्छंदपणे सुरू असतो, मग तो आपल्याला आवडो किंवा न आवडो ... त्याची पर्वा आपलं मन कधीही करत नाही. याच विचारात मी हरवले होते पण मन:चक्षु समोर २६ जानेवारी २०१८ हा दिवस जसाच्या तसा साकारत होता.... अगदी काल परवा घडल्यासारखा ... सिद्धीने आमच्या शाळेतल्या दहा-बारा मुलींना घेऊन भक्ती शक्ती चौकात वंदे मातरम् सादर केले होते. त्याचं झालं असं की चार-पाच दिवसांपूर्वी मला महानगरपालिके...

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

Image
सिद्धीच्या फेसबुक पेजवरील पोस्ट High Commission Of India, London यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरील पोस्ट बजे सरगम हर तरसे गूंजे बनकर देस राग 🇮🇳 इंडिया हाऊस, लंडन  मध्ये संवादिनीच्या साथीने सिद्धीचे स्वर घुमत होते ...  बजे सरगम हर तरफ़ से  ताल कदमोंपे जाये जाग । लबपे जागे गीत ऐसा गूंजे बनकर देस राग ।। सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि लगेचच सिद्धीने सुरावट छेडली ... मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका ... अगदी दिवाळीचा माहोल बनला होता. दीपप्रज्वलन झाल्यानंतर मा. उच्चायुक्त (High Commissinor) विक्रम दोरायस्वामी दिव्याच्या ज्योतिबाबत, प्रकाशाबाबत बोलले होते आणि तीच ज्योत सिद्धीने तिच्या संगीतातून तेवत ठेवली होती. तिने थोडी सरगम प्रेक्षकांना सुद्धा गायला लावली आणि त्यालाच जोडून तिने स्वर आळवले... देस रागातील आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम् . .. या गीताचं हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष ... येत्या ३१ ऑक्टोबरला तिथीने तर ७ नोव्हेंबरला तारखेने या गीताला दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. तो आठवडा राष्ट्र सेविका समितीच्या वतीने संपूर्ण वंदे मातरम् सप्ताह म्हणून साजरा करण...