सेवा परमो धर्म: ।
सेवा परमो धर्म: । गोविंदा ... गोssssविंदा अत्यंत जादुई असा हा जयघोष. तब्बल सात दिवस या जयघोषाच्या अनुभूतीने कान आणि मन अगदी तृप्त झालंय. त्या तृप्तीतच परतीचा प्रवास सुरू आहे. डोळ्यासमोरून व्यंकटेशाचे रूप हटतच नाहीये आणि ते सर्व क्षण नजरेसमोर सतत तरळत आहेत. ये हृदयीचे ते हृदयी पोहोचावं म्हणून माझं हे मनोगत ... हा लेखप्रपंच ❤️ ... त्याचं झालं असं .... मागच्या वर्षीपासून सतत माझ्या मनात येत होतं की आपण तिरुपती बालाजीच्या सेवाकार्यासाठी जाऊया. माझी जाऊ नऊ/दहा वर्षांपूर्वीच या सेवेसाठी जाऊन आली होती. पण मी कधी तो विचारही मनात केला नाही. पण गेल्या दोन-चार वर्षात परमेश्वराने माझ्यावर/माझ्या कुटुंबावर जो काही सुखाचा, आनंदाचा, यशाचा वर्षाव केला तेव्हा मात्र त्या परमेश्वराचे आभार आपण मानलेच पाहिजेत ही भावना दृढ झाली आणि सेवेला जाऊयाच या विचाराने जोर धरला. पण जाणं इतकं सहज/सोपं नाहीये हे लक्षात आलं. दोन-चार वेळा संधी येऊनही कुठल्या ना कुठल्या कारणाने हुकली (इथे ती कारणे लिहीत नाहीये) पण यावेळी मात्र योग आला आणि तो देखील अधिक महिन्यात... या वेळेची अडचण तसं बघायला गेलं तर जास्त मोठी ...