आजि सोनियाचा दिनु
यश हे अमृत झाले !!! वंदे मातरम् आजि सोनियाचा दिनु सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!! आजपासून बरोब्बर वर्षांपूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे पाच वाजायच्या सुमारास गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् मधून औपचारिक रित्या कळविण्यात आले की सिद्धी कापशीकर हिने जवळपास साडेदहा तास सलग संवादिनी वाजविण्याचा जो प्रयत्न केला त्याला यश आले आहे. तिच्या या प्रयत्नाची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स ने तिची नोंद घेतली आणि तिला मान्यतेचे प्रमाणपत्र दिले. मग काय विचारता ... आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ... भराभर तिच्या या कामगिरीचा मेसेज टायपून सर्वत्र धाडून दिला आणि अक्षरशः शून्य मिनिटात सुरू झाला अभिनंदनचा, कौतुकाचा वर्षाव !! आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु । आजि सोनियाचा दिनु । माझी ही लंडनवारी अगदी सार्थकी लागली हा विचार मनात चालू होता. आलेल्या प्रत्येक मेसेजला प्रतिसाद देईपर्यंत फोनची रीघ लागली. प्रत्येकाशी अगदी थोडंच बोलणं शक्य होतं, कारण त्याचवेळी बरेचसे कॉल्स वेटिंगवर होते. अर्थातच सगळ्यांनी ते समजून घेतलंही. खूप जणांनी हात आखडता न घेता अ...