Posts

Showing posts from October, 2023

लंडनवारी - भाग १

Image
लंडनवारी - भाग १ शीतल निघाली लंडनला आमचे येथे विवाहासाठी कुंडली मिलन करून मिळेल ... वास्तुदोष निवारण तसेच पत्रिकेतील विविध योग याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल ... इत्यादी पाट्या माझ्यासमोर फेर धरून नाचत होत्या. माझ्या स्वतःच्या पत्रिकेतील त्रिकोण, चौकोन, षट्कोन, अष्टकोन मी खूपदा न्याहाळले. पण माझा गणित विषय पक्का असूनदेखील या कुंडलीचे गणित आणि भूमितीही माझ्या लक्षात येत नव्हती. परदेशगमन योग नक्की कसा दिसतो हे विचारावे असे शंभरदा मनात येऊन देखील तो प्रश्न मी सदैव गिळून टाकायची. परंतु साडेचार वर्षांनंतर माझ्या कुंडलीतील हा योग पुन्हा एकदा गडद झाला आणि शीतल निघाली लंडनला .... मागच्या वेळेस मी परदेशात गेले होते ते एक प्रवासी अर्थात Tourist म्हणून आणि आता जात होते ते Visitor म्हणून. निमित्त होते लेकीचा पदवीदान समारंभ अर्थात Convocation . मागच्या वर्षीच सिद्धी परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेली. तेव्हापासूनच हा योग गडद व्हायला सुरुवात झाली असावी. उन्हाळा हा लंडनमध्ये पर्यटनाला जाण्यासाठी योग्य हे माहीत होते, त्यामुळे संपूर्ण मे महिना आंग्लभूमीत काढूया असा विचार मी मनाशी करत असतानाच मा...