Posts

Showing posts from April, 2021

लेकीचे (पहिले) रक्तदान

Image
  लेकीचे (पहिले) रक्तदान ..... अनेकांचे रक्तदान केल्याचे स्टेटस  पाहिले आणि या बयेच्या मनाने रक्तदान करायचे ठरवले. असंही सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) झाल्यापासून जगातली प्रत्येक गोष्ट मी अगदी करूच शकते याचा उच्चार ती वारंवार करत असतेच. सध्याची परिस्थिती , रक्ताची निर्माण झालेली तीव्र गरज , येऊ घातलेलं लसीकरण हे सगळं बघता तिच्या या उत्साहात मी पण सहभागी झाले. सावरकर भवनमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी जी लिंक होती त्यावर रजिस्ट्रेशन केले. आता काय काय तयारी करूया इकडे गाडी वळली. सर्वप्रथम वजन तपासले ... ४७ किलोग्रॅम भरले. संयोजकांनी किमान ५० किलो वजन असावे ही अट सांगितली होती. ही नेहमीप्रमाणे गूगलबाबांच्या आश्रयाला गेली आणि त्यावर किमान वजन ४५ किलो लागते हे शोधून काढले. पुरावा म्हणून तो स्क्रीनशॉट काढला. हिमोग्लोबिन १२.५ पाहिजे होते .... हिचे १३.५ ... (आम्हाला कोरोना झाला होता त्यावेळी हिमोग्लोबिन तपासले होते ना) .. स्वारी खुशीत होती एकदम. अजून काय काय तयारी करूया ग ? काल संध्याकाळपासून विचारत होती. सगळी दुकाने - मॉल्स बंद असल्याने नवीन ड्रेसची खरेदी वाचली. क...