गूंजे बनकर देस राग 🇮🇳
सिद्धीच्या फेसबुक पेजवरील पोस्ट High Commission Of India, London यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरील पोस्ट बजे सरगम हर तरसे गूंजे बनकर देस राग 🇮🇳 इंडिया हाऊस, लंडन मध्ये संवादिनीच्या साथीने सिद्धीचे स्वर घुमत होते ... बजे सरगम हर तरफ़ से ताल कदमोंपे जाये जाग । लबपे जागे गीत ऐसा गूंजे बनकर देस राग ।। सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि लगेचच सिद्धीने सुरावट छेडली ... मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका ... अगदी दिवाळीचा माहोल बनला होता. दीपप्रज्वलन झाल्यानंतर मा. उच्चायुक्त (High Commissinor) विक्रम दोरायस्वामी दिव्याच्या ज्योतिबाबत, प्रकाशाबाबत बोलले होते आणि तीच ज्योत सिद्धीने तिच्या संगीतातून तेवत ठेवली होती. तिने थोडी सरगम प्रेक्षकांना सुद्धा गायला लावली आणि त्यालाच जोडून तिने स्वर आळवले... देस रागातील आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम् . .. या गीताचं हे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष ... येत्या ३१ ऑक्टोबरला तिथीने तर ७ नोव्हेंबरला तारखेने या गीताला दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. तो आठवडा राष्ट्र सेविका समितीच्या वतीने संपूर्ण वंदे मातरम् सप्ताह म्हणून साजरा करण...