अष्टविनायक
अष्टविनायक महती कालची भवितव्य लेख बैठक संपवून घरी जायला निघताना अनेकांनी येऊन " कार्यक्रम मस्तच झाला ग ... दोन्हीही , युट्यूब लाईव्ह आणि रोजचे रेकॉर्डेड गीत सुद्धा ... आम्ही रोज सकाळी १० वाजता बघायचो बरं का विडिओ" ... ऐकून खूपच मस्त वाटलं. आणि मन मात्र या कार्यक्रमाचा इतिहास आठवायला लागलं. अगदी फ्लॅशबॅक टाईप. लहानपणी कॅसेटवर ही गीते ऐकली होती आणि मोठया आवाजात गायिकेबरोबर म्हटलीसुद्धा होती. पुढे कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकवेळा या गणपतींना गेले सुद्धा. आत्ता ५-६ वर्षांपूर्वी अष्टविनायक यात्रा सुद्धा केली. तेव्हाच या थीमवर एखादा कार्यक्रम करू असं मनात ठरवलं पण योग आला नाही. मग मागच्या वर्षी ठरवलंच की गणेशोत्सवात मुक्तिसोपान विभागाचा हा कार्यक्रम तयार करूया. नियोजन देखील झाले. सगळ्यांनी आपापल्या गाण्यांची तयारी सुरू केली आणि अस्मादिकांना कोरोना राक्षसाने वेढा घातला. अगदी बरोब्बर मागच्या गणेशोत्सवातच. मग काय ... कोंढाण्यावर जसे तानाजी धारातीर्थी पडल्यावर मावळे पळ काढत होते तसे झाले. तिथे निदान सूर्याजी दोर कापून उभा ठाकला पण आमच्याकडे मात्र तो प्रकल्प बासनात ग...