Posts

Showing posts from December, 2020

राष्ट्रसंत गाडगेबाबा

जय भवानी जय श्री जगदंबे । नमन तुज अंबे । करुनि प्रारंभे । डफावर थाप तुणतुण्या ताण । शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण । शाहीर हा भारतीयांची शान । आधुनिक संतांचे गातो गुणगान जी जी जी ।।१।। महाराष्ट्रातील वऱ्हाड । तिथे जन्मले । कीर्तनकार । भक्ती नको केवळ मूर्तीची । सेवा करू आपण समाजाची । धडे स्वच्छतेचे ज्यांनी दिले । अन्याया विरुद्ध बंड केले । जातिभेदाला नाही मानले । व्यसनाला तडीपार केले । जनतेला सन्मार्गास लावले । गाडगेबाबा कीर्ती भली पावले हो जी जी जी ।। २।। शेंडगावचे जानोरकर । बडे प्रस्थ ते होते फार । झिंगराजीचा मोठ्या झोकात । मान तो होता सर्व गावात । पूर्णा काठच्या दापुऱ्याची । लेक सखूबाई कोळसेकरांची । लगीन सोहळ्यात प्रथेप्रमाणे । सांडली दारू बोकड बळी दिले । व्यसनाधीनता घात हा झाला । मुकले घरदार शेतीवाडीला । सावकारी देणी वाढत गेली। धूळधाण प्रपंचाची झाली । तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर । महाशिवरात्रीचा उपवास निरंकार । झिंगराजी नि सखूबाई पोटी । जन्मे संतती गोरी गोमटी । माता पित्याला आनंद झाला । डेबूजी ठविले नावाला । पितृछत्र लवकर हरपले । माय लेकरू पोरके झाले । पिता मायेला सांगून गेला । एक...