विश्वविक्रमाची कथा
विश्वविक्रमाची कथा आईईईई .... शट शट शट ... Oh No ... It's unbelievable .... आपलं approval आलंय, थांब मी सर्टिफिकेट डाऊनलोड करून तुला पाठवतेच ... हे आणि असंच बरंच काही ती फोनवर बोलत राहिली. मला मात्र काहीही ऐकू येत नव्हतं, डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं ... आणि मन मात्र झर्रर्रर्रर्रकन उडून गेलं लंडनला... १८ जानेवारीला लंडनच्या सकाळी १० वाजता मी हिथ्रो विमानतळावर दाखल झाले. इमिग्रेशन वगैरे सोपस्कार करून बाहेर येऊन बघितले तर लेक माझी वाटच बघत होती. मी पोहोचल्यावर तिने मला घट्ट मिठी मारली आणि आई किती बरं झालं ग तू आलीस, मला काही सुचतंच नव्हतं असं म्हणून रडायलाच लागली. लगेचच आम्ही कॅबने घरी गेलो आणि सगळं घर आवरलं. घडून गेलेल्या घटनेचा तिच्या मनावर बराच खोलवर परिणाम झाला होता आणि आता तिला यातून बाहेर काढणं गरजेचं होतं. तिने तिचे ऑफिस नियमित सुरू केले. २० जानेवारीला मी तिला म्हणाले ... चल आजपासून २ फेब्रुवारीची तयारी करायला घेऊया. देवाने तुझी मोठी परीक्षा घेतली आणि त्यात तू पास पण झालेली आहेस. त्यामुळे आता हा दोन तारखेचा इव्हेंट आपण करूयाच. जणू काही ती माझ्या या...