आणि मी positive झाले......

 १९ ऑगस्टची सकाळ ... कालची रात्र कशीबशी संपवून उजाडलेली ... स्मिताशी फोनवर बोलत होते... अग गणेशोत्सवात कोरोनाविषयक व्याख्यान द्यायचे आहे , देशील का ? मला मध्येच तोडत ती म्हणाली ... तुझा आवाज इतका दमलेला का ग ? आता तिच्यातली डॉक्टर बोलायला लागली ... तुला दीड दोन दिवस ताप वगैरे होता , ठीक आहे पण त्याने इतकी energy जात नाही बरं का ...

आणि मी १३ ऑगस्टपासूनचा सगळा पट आठवू लागले. सतत तिच्याच विश्वात , संगीतात रमणारी माझी लेक ... सिद्धी अचानक तापली. क्रोसिन देऊन झोपवले तिला. दुसऱ्या दिवशी १४ तारखेला परिचित डॉक्टर मेधा देवळेकर यांना फोन केला. त्यांनी फोनवर सर्व व्यवस्थित चौकशी करून , history जाणून घेऊन ताबडतोब आयुर्वेदिक पुड्या पाठवल्या. पूर्ण दिवस पोरगी झोपून आणि मी विचारात बुडून. माझ्या आईने लगेच दृष्ट वगैरे काढ असे घरगुती सल्ले दिले. ते ही केले आणि अहो आश्चर्यम... १५ ला संध्याकाळी ही बया ओके वाटली. कशाचा का होईना गुण आला या समाधानात मी असतानाच १६ ऑगस्टला दुपारी जेवणानंतर मी आडवी. पुन्हा मेधाताईंना फोन.. गोळ्या-पुड्यांचा मारा... आणि हलकेसे सूतोवाच .... टेस्ट करून घेतेस का ?

१७ तारखेला मी बरीच बरी झाले. १८ तारीख तर अगदी नेहमीसारखी गेली आणि अचानक संध्याकाळी मला दम लागायला लागला. अगदी ६-७ मजले चढून गेल्यावर लागतो तसा. एव्हाना थोडंसं काही वाटलं तरी मेधाताईंना फोन हे ठरलेलं होतंच. सुदैवाने सिद्धीला ताप आल्या आल्या माझ्या दिरांनी ऑक्सिमीटर आणून दिले होतेच. त्यावर तपासले असता माझी ऑक्सिजन पातळी खालावते आहे आणि सिद्धीचे पल्स खूप हलत आहेत असे जाणवले. मेधाताई म्हणाल्या ... काळजी करू नकोस पण उद्या जरा निर्णय घेऊया का बघ. रात्री डोक्यात विचारांचे काहूर... कशीबशी रात्र संपवली.

सकाळीच मैत्रीण पूर्वा ... जिने मागच्याच महिन्यात ही लढाई जिंकली होती तिला फोन करून सगळी चौकशी केली. आत्ता या डॉक्टर मैत्रिणीशी बोलताना सगळं आठवलं. टेस्ट करायला जायचंच हा कौल मनाने दिला. लेकीला सांगितले , आवर पटकन .. आपण निघतोय. पटकन मंजूला (जाऊ) फोन केला आणि आम्ही दोघी तालेरा हॉस्पिटलमध्ये जाऊन धडकलो.

एकदा मनाची तयारी असली की सगळ्या गोष्टी खूप सोप्प्या होतात. आमचं तसंच झालं. तिथली अगदी व्यवस्थित असलेली सिस्टिम आम्हाला खूपच भावली. Swab टेस्ट झाली. आमचे ७४ , ७५ नंबर होते. तुम्ही घरी जा असे सांगण्यात आले. आमची टेस्ट negative.. हा आम्ही सोयीने घेतलेला अर्थ. पण इतकी छान सोय , हा अनुभव कुठेतरी नोंदवू म्हणून तिथल्या डॉक्टरांना भेटलो. डॉ. प्रतिमा .. मोठी गोड मुलगी. प्लीज तुम्ही बसा ना , खूप छान वाटलं तुम्ही appreciate केलंत ते वगैरे बोलत होती. बोलता बोलता पटकन म्हणाली मॅम तुम्ही positive आहात बरं का ! मी लगेच सिद्धीचे विचारले तर तीही positive. 

पटकन मेधाताईंना फोन लावला. दोघीही positive आहोत. सोसायटीच्या ,शाळेच्या ग्रुपवर पोस्ट केले आणि जवळच्या लोकांना फोन करून सांगितले. सगळ्यात आधी नवऱ्याला फोन केला... अरे आम्ही दोघी positive आहोत. त्याचे हसत हसत उत्तर ... अग तुमचा दोघींचा स्वभाव , सगळं आयुष्य सकारात्मकतेने भरून उरले आहे त्यात या positive टेस्टची भर... आणि माझं मन पिसासारखं हलकं झालं. आता मी ह्या कोरोनाशी लढायला सज्ज झाले होते.. होय मी कोरोना positive झाले होते.

क्रमशः .........

Comments

  1. छान लिहलेत ताउ

    ReplyDelete
    Replies
    1. समाजातील कोरोनाची भीती जाऊन जागरूकता वाढावी म्हणून हा छोटासा प्रयत्न 🙏

      Delete
    2. खूप सकारात्मकता आहे ताई तुमच्यामध्ये .सलाम तुम्हा दोघींना

      Delete
  2. तुझ्या या लेखनामुळे समाजात खरोखर चांगल्या अर्थाने positivity पसरेल... पुढचे लेखन लवकर पाठव ...उत्सुकता आणि काळजी दोन्ही आहेत

    ReplyDelete
  3. तुम्ही लढवय्या आहात च समाजाला सुद्धा मदत करताय

    ReplyDelete
    Replies
    1. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं , बाकी हरीची इच्छा 🙏

      Delete
  4. ताई खरच gr8 आहात तुम्ही

    ReplyDelete
    Replies
    1. ग्रेट असं नाही पण माझे अनुभव सांगितल्याने अनेकांचा धीर वाढतोय म्हणून हा लेखप्रपंच ...

      Delete
  5. खूप छान लेखन,नक्की याचा इतरांना उपयोग होईल.खरं तर तू positive आलीस तेव्हा मलाच भीती वाटून गेली,पण त्यानंतर जेव्हा जेव्हा तुझ्याशी बोलणे झाले तेव्हा तुझ्यातली सकारात्मकता प्रकर्शाने जाणवली.आणि त्यानंतर मात्र तू या संकटावर यशस्वीपणे मात करणार याविषयी खात्री पटली.आयुष्यात कोणत्याही संकटाला धिराने सामोरे जाता येते हेच तू तुझ्या वागणूकीतून दाखवून दिलेस.मला खात्री आहे या आजारात आलेला अशक्तपणाही लवकरच दूर होईल

    ReplyDelete
  6. ताई जबरदस्त😊👌👌 छान लिहिलंय...खूप सकारात्मक वाटलं ...

    ReplyDelete
    Replies
    1. हीच सकारात्मकता पसरवून कोरोनाला पळवूया

      Delete
  7. विचारांची positivity वाढविणारे 👌👌लेखन .

    ReplyDelete
  8. याला म्हणतात सकारात्मकता .पार बेईज्जत करून टाकले तुम्ही दोघींनी koronala

    ReplyDelete
    Replies
    1. आता पेपरची हेडलाईन.... बेईज्जत झाल्याने कोरोनाचे पलायन 😂😂

      Delete
  9. शीतल तुमच्या सकारात्मक विचारांनी खरंच bakichyanahi तशीच चांगली ऊर्जा मिळो,तुम्ही दोघी यातून लवकरच सही सलामत बाहेर येणार याची खात्री आहेच

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच ... कोरोना हा शारीरिक बरोबर मानसिक आजार आहे. त्यातून बरे व्हायला एकच उपाय ... सकारात्मकता

      Delete
  10. तुमच्या दोघींच्या सकारात्मक विचारांमुळे तुम्ही तर लवकर बऱ्या होणारच पण कितीतरी लोकांना test करून घेण्याची प्रेरणा मिळेल आणि जे covid positive आहेत त्यांचे ह्या लढ्यात मनोबल वाढेल.

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना ग
      असे झाले म्हणजे लेखन सार्थकी लागले म्हणायचे

      Delete
  11. तुम्ही दोघी खूपच धिराच्या आहात.तुझ्या लेखामुळे भीती वाटत नाही आता.

    ReplyDelete
    Replies
    1. समाजाच्या मनातील भीती कमी व्हावी म्हणून तर हा ब्लॉग प्रपंच 🙏

      Delete
  12. ताई
    तुमच्या लेखनाने इतरांचे मनोबल निश्चितच वाढेल.
    तुम्हीही कोरोनावर मात केली व त्याला हरवलत.
    याबयाब आपले खूप खूप अभिअभिनंदन.

    ReplyDelete
  13. Sheetal..this is good example of positive spirit..will definitely help others to know how to face such situation

    ReplyDelete
  14. Positive approach won the battle of Covid-19 .

    ReplyDelete
  15. He lihina hi khari samaj seva ahe ga

    ReplyDelete
    Replies
    1. आपण आपल्या परीने करत राहायचं 🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।